माझा दृष्टिकोन: शिक्षकांचे गुणकौशल्य आणि भूमिका
श्री गणेश नरोत्तम पाटील (स्नेहवलयकार)

माझा दृष्टिकोन: शिक्षकांचे गुणकौशल्य आणि भूमिका
‘शिक्षण’ हा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ असतो. “विद्यार्थी ज्ञानसागरात पोहणारा राजहंस असतो तर, या राजहंसास दिशा देणारा शिक्षक म्हणजे ज्ञानसागरातला दीपस्तंभ होय”. विद्यार्थ्याच्या आयुष्याला योग्य मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान म्हणून शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. एक चांगला शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही, तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविणारा,त्यांना योग्य संस्कार देणारा आणि भविष्यासाठी सक्षम करणारा असतो. एक आदर्श शिक्षक ज्ञानाने परिपूर्ण असतो आणि विद्यार्थ्याला विविध प्रकारे शिकवित असतो. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मार्गदर्शन करतो. प्रोत्साहित करतो. तो विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो. त्यांना चांगले नागरिक बनण्यास मदत करतो. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतो. एक चांगला शिक्षक समाजाला एक चांगली पिढी देतो.जी देशाच्या विकासासाठी योगदान देते.
शिक्षक हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे.एक आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असतो.त्यांचा आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतो. मी स्वत: एक संस्कारक्षम, उत्साही,अभ्यासूवृत्ती असलेला ज्ञान उपासक, मेहनती, समर्पणवृत्ती काम करणारा शिक्षक आहे.अशी भावना प्रत्येक शिक्षकाची असायला हवी. अध्ययन अध्यापनात नाविण्यत: आणणे. अध्ययन प्रक्रिया सुलभ करणे. तंत्रज्ञानाचा वापर करुन अध्ययन अध्यापन,कृती अनुभवाधारित अध्ययन अध्यापन तसेच प्रात्यक्षिक ,कला क्रीडा एकात्मिक अध्यापन अशा विविध विविध नाविन तंत्र पध्दती कौशल्यांचा वापर आदी गुणकौशल्य आजच्या २१ व्या शतकातील शिक्षकात असली पाहिजेत किंबहुना ती प्राप्त करण्याचा प्रयास केला पाहिजे.
अभ्यासू ,जिज्ञासू ,काहीतरी नवं घेणं आणि नवं देण्याची ऊर्मी असलेल्या शिक्षकाला विविध प्रशिक्षणात सहभाग घणे, प्रशिणात तज्ञ मार्गदर्शक, सुलभक म्हणून काम करणे आवडते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद द्वारे आयोजित विविध उपक्रम स्पर्धांमध्ये सहभागी होणे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची प्रभावी अमंलबजावणीसाठी सहकारी शिक्षकांना मार्गदर्शन करणे. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे. सध्या एक पर्यवेक्षक नात्याने शिक्षक विद्यार्थी यांची कामगिरीची दखल घेऊन कौतुक करणे आणि प्रोत्साहन देणे. विविध शालेय कार्यक्रमांचे आयोजन करणे. नवनवीन उपक्रम राबविणे आवडते. एका चांगल्या शिक्षकामध्ये सहानुभूती, संयम, उत्कृष्ट संवाद कौशल्ये, सर्जनशीलता, अनुकूलता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणे हे गुण असतात. तसेच, सतत नवीन ज्ञान आत्मसात करण्याची आवड, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांच्या शिकण्याची प्रक्रिया सुकर करण्यासाठी विविध अध्यापन पद्धतींचा वापर करणे हे देखील आदर्श शिक्षकाचे वैशिष्ट्य असते.
शिक्षकाची प्रमुख गुणवैशिष्ट्ये:
सहानुभूती: विद्यार्थ्यांना समजून घेणे आणि त्यांच्या गरजा व समस्यांबद्दल सहानुभूती दाखवणे.सहकार्य करणे.
संयम: विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुरेसा वेळ देणे आणि चुकांमधून शिकण्यास मदत करणे, यासाठी संयम आवश्यक आहे.
उत्कृष्ट संवाद कौशल्ये: विद्यार्थ्यांना स्पष्टपणे शिकवणे आणि त्यांचे विचार ऐकून घेणे. शिक्षक ,विद्यार्थी , समाज यांचेशी सुसंवाद साधणे हे कौशल्य अवगत असते.
सर्जनशीलता: विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी आणि विषय अधिक मनोरंजक बनवण्यासाठी सर्जनशील मार्गांचा वापर करणे. स्वत: नवविचार नवकृतींना नवकौशल्यास चालना दिली पाहिजे.सर्जनशील पातळीवर नेऊन अध्ययन अध्यापनाची कृती उपक्रमास दिशा देणारा शिक्षक कुशल गुणवंत शिक्षक असतो.
अनुकूलता निर्मिती: बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आधुनिक तंत्रज्ञान व अध्यापन पद्धतींचा स्वीकार करणे. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अनूकुल वातावरण निर्मिती, सहशालेय उपक्रम व कार्यक्रमास अनुकुल वातावरण निर्मिती शिक्षकाने केली पाहिजे.
सुलभता कौशल्य: विद्यार्थ्यांसाठी नेहमी उपलब्ध असणे, जेणेकरून त्यांना मदत मागण्यास किंवा प्रश्न विचारण्यास संकोच वाटणार नाही.
आजीवन शिकण्याची आवड: स्वतःचे ज्ञान आणि अध्यापन कौशल्ये अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत राहणे.
सतत ज्ञानाची तहान भूक असावी.सतत नवनवं माहिती ज्ञान तंत्र अवगत करावे.
आत्मविश्वासाने भरलेलं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे: विद्यार्थ्यांना सक्षम आणि आत्मविश्वासू बनवण्यासाठी प्रेरित करणे. एक आदर्श , गुणवंत,कतृत्ववान, कुशल शिक्षक आत्मविश्वासाने भरलेलं व्यक्तिमत्व असते. एक उमेदी, उत्साही,सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणजे आदर्श कतृत्ववान शिक्षक होय.
उत्तम आरोग्य: शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहणे, जेणेकरून आपले कार्य प्रभावीपणे करता येईल.
आदर्श आणि प्रेरणादायी असणे: विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर चांगले संस्कार आणि जीवन कौशल्ये देखील शिकवतो.असा शिक्षक स्वत: प्रेरणेचा स्रोत बनतो.
सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक
विचारांचा खजिना: आदर्श शिक्षक म्हणजे सकारात्म
दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारांचा अखंड वाहणारा स्रोत असतो. असा शिक्षक म्हणजे शाळेला आणि विद्यार्थी व शिक्षकबंधूमित्रांना मिळालेला खजिनाच!
उपक्रमशीलता: सतत काहितरी नवीन करणे. पुस्तकी ज्ञानाला कृती उपक्रमाची जोड देणे, कृती अनुभवातून शिक्षण हा जणू छंद असावा. कठिण सोपं कसं होईल यासाठी सतत उपक्रम शोधणे व नवनवीन कल्पक उपक्रम राबवितो अशी उपक्रमशीलता शिक्षकाच्या अंगी असावी.
कर्तव्यतत्परता आणि वक्तशीरपणा: आदर्श कर्तृत्ववान शिक्षक हा कर्तव्यतत्पर आणि वक्तशीर असतो. आपल्या मुख्य कर्तव्यापासून लांब जात नाही. एखादे काम जोवर पूर्ण होत नाही; तोपर्यंत तो स्वस्थ बसत नाही. ठराविक कामे ठराविक वेळेत कशी अहोरात्र करुन पूर्ण होतील यावर त्याचा भर असतो. ठराविक कार्य ठराविक वेळेत , योग्य वेळेत करणे . काम व वेळेचे नियोजन याबात कर्तव्य तत्पर आणि वक्तशीर असतो.
समर्पण भाववृत्ती: आपण घेतलेला वसा कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता स्वत:ला शिक्षणाच्या प्रवाहात झोकून देतो . त्यातच त्याला समाधान वाटते. संत नामदेवांच्या ‘नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ या अभंगातील उक्ती प्रमाणे तो समर्पण भाववृत्तीेने
ज्ञानदानाचे कार्य करत असतो.येथे स्व:चा फायदा तोटाचा विचार करत बसत नाही. विद्यार्थी हित हेच आपले हित मानून कार्य करत राहतो.
मातृभाषा आणि बोलीभाषांविषयी अस्मितता: शिक्षकाला आपली प्रादेशिक भाषा, मातृभाषा विषयी प्रेम अभिमान असावा. तसेच परिसरातील विविध बोलीभाषांचा सन्मान करावा. त्या बोलीही जीवंत अशा राहतील तसेच त्यातील साहित्य,संस्कृतीचे जपवणुक करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
सामाजिक कार्यात आवड: शाळा ही समाजाची प्रतिकृतीच असते. शाळा म्हणज एक सामाजिक संस्था असते. शाळेने समाजात जाऊन उपक्रम करावे.अर्थातच समाज व घडविण्याचे काम शाळेद्वारे होते.तेव्हा शिक्षकास सामाजिक कार्याचीही आवड असावी. जसे परिसर स्वच्छता,ज्येष्ट नागरिकांचा सन्मान करणे, आवश्यक ते सहकार्य करणे, गावातील सामाजिक कार्यक्रमात सहकार्य करणे.संकट काळात शासनास तसेच समाजाला आपल्या परीने जेजे होईल ती मदत किंवा सेवा करणे. जसे कोरोना कोविडच्या काळात प्रबोधन, आरोग्य, स्च्छता,सर्वेक्षण,लसीकरण वैगरे कामात शिक्षक मनापासून काम करत होते.
राष्ट्रीय कार्यास आवड: राष्ट्रदेवोभव मानून देश कार्याची मिळालेली संधी उत्तमपणे निभावणे. हर र तिरंगा अभियान , राष्ट्रीय साधनसंपत्तीचे संवर्धन ,राष्ट्रध्वजनिधी,सैनिककल्याण निधी, नागरिकांना विविध योजना व सेवा या बाबतचे मार्गदर्शन, लोकशाही , संविधान यांचा सन्मान, लोकसभा , विधानसभा असेल किंवा जिल्हा तसेच स्थानिक निवडणुक मतदान कार्य असेल तत्परतेन व निष्ठेनं आणि जबाबदारिने पार पाडणे.
पर्यावरण विषयी जागृकता व निसर्गावर प्रेम: प्रदुषण टाळणे, पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविणे,संतुलित व आरोग्यदायी पर्यावरणासाठी प्रबोधन करणे व ठोस उपक्रम हाती घेणे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे. वृक्षारोपण करणे आणि वृक्षसंगोपण व संवर्धन करणे.परिसर स्वच्छ सुंदरहिरवा सुशोभित प्रसन्न प्रदुषणमुक्त करणे यासाठी प्रयत्नशील असतो.
साहित्य, संस्कृती आणि कलांची जोपासना: आदर्श कर्तृत्ववान शिक्षक साहित्य ,संस्कृती आणि विविध कला लोककला यांची जोपासना करतो. सन्मान करतो. कविता,कथा,नाटके,चरित्र,ललित लेखन विविध साहित्य प्रकार याचा रसास्वाद घेतो किंबहुना त्यांचा सन्मान करतो . स्वत:स लेखनाचीही आवड जोपासतो. सण, उत्सव,परंपरा संस्कृती चा परिचय देतो. आदर्श परंपरा संस्कृती टिकविणे व संवर्धन करणे साठी शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम , माहिती द्वृरे प्रयत्न करत असतो. तसेच विविध कला लोककलांचा लोकोत्सवचा अभ्यास करतो त्याचा अविष्कार करणे ते ज्ञान टिकविणे यासाठी ही प्रयत्न करतो.जसे वारली चित्रकला..खानदेशातील लळितोत्सव, कानबाई उत्सव, भुलाबाई इत्यादी.
ज्ञानपारायण आणि विद्यार्थीपारायण: आदर्श, कर्तृत्ववान, गुणवंत शिक्षक केवळ अभ्यासू किंवा केवळ विद्यार्थीप्रिय असतो असे नाही, तर तो ज्ञानपारायण असतो.सतत नवनवीन ज्ञान तंत्रज्ञान कौशल्य मिळवत असतो शिवाय विद्यार्थ्याच्या अंगभूत सुप्त गुणकौशल्यंंचा सतत शोध घेतो. विद्यार्थ्यंना जाणून घेतो अर्थात शिक्षक ज्ञानपारायण बरोबरच विद्यार्थी पारायणही असतो.
वाचन तसेच लेखनाचा व्यासंग: शिक्षकाला आपल्या विषयज्ञानाची विविध पुस्तके ग्रंथ शिवाय मासिके, साप्ताहिके, दैनिक वृत्तपत्र वाचनाची आवड असावी. वाचनाचा व्यासंग हवा तसेच विविध लेखन अहवाल लेखन,पत्रलेखन तसेच कथा, कविता,चारोळी साहित्यिक लेखनाचीही आवड असावी.
ज्ञानरचनावाद शिक्षणपद्धतीत, शिक्षकाची भूमिका ज्ञानरचिता : पारंपरिक ज्ञान देणाऱ्या व्यक्तीऐवजी विद्यार्थी-केंद्रित मार्गदर्शक, सुविधादाता आणि समुपदेशक म्हणून असते. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास, विचारांचे आदानप्रदान करण्यास आणि स्वत:च्या अनुभवातून नवीन ज्ञान तयार करण्यास प्रवृत्त करतात, तसेच त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे मदत करतात.
शिक्षकाची मुख्य भूमिका:
मार्गदर्शक : शिक्षक विद्यार्थ्यांना नवीन माहिती शोधण्यासाठी आणि संकल्पना समजून घेण्यासाठी विविध संसाधने आणि संधी उपलब्ध करून देतात.
समुपदेशक: विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील अडचणींवर मात करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षक मार्गदर्शन करतात.
सुविधादाता / सुलभक: शिक्षक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य, साधने आणि आवश्यक वातावरण तयार करतात, जेणेकरून विद्यार्थी सक्रियपणे शिकू शकतील.
प्रोत्साहक / प्रेरक: विद्यार्थी स्वतःचे ज्ञान तयार करू शकतील अशा विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात.
प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणे: विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी, शंका विचारण्यासाठी आणि विविध कल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, जेणेकरून ते सक्रियपणे शिकतील.
समीक्षात्मक / चिकित्सकविचार कौशल्ये: शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी, विचार करण्यास आणि स्वतःचे निष्कर्ष काढण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांची चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढते.
ज्ञानरचनावादी शिक्षक: शिक्षक हे केवळ ज्ञानाचे केवळ वाहक नसून, विद्यार्थ्यांना ज्ञानाचे निर्माते बनवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे सक्रिय भागीदार असतात.
शिक्षक ज्ञानरचनावादाचे भांडार असावेत.
तंत्रस्नेही व तंत्रज्ञानाचा वापरकर्ता: सध्या तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात वापरले जात आहे. शिक्षण क्षेत्रातही तंत्रज्ञानाने क्रांती णली आहे.सर्व शैक्षणिक कामे संगणकिय झाली आहे. विविध शैक्षणिक अॅप आली आहेत. कोलॅबरेशन,व्हिडीओ काॅन्फरन्स ,आॅनलाइन वेबीनार , कार्यशाळा, प्रशिक्षणे, झुममीट, गुगलमीट,दिक्षावर अभ्यास , प्रशिक्षणे ई-शैक्षणिक साहित्य,पीएम ई-विद्या, स्वयंम यांचा वापर करणे ,हाताळणे. प्रभाविपणे शिक्षणात तंत्रज्ञानाचा सहाय्याने अध्ययन अध्यापनाचे कामकाज करणे हि काळाची गरज आहे.
आव्हान निर्माते व आव्हानांना सोडविण्याची
क्षमता: २१ व्या शतकात येणारी नवी आव्हाने
लक्षात घेता विद्यार्थ्यांना येणारी नवी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम करणे.तसे कौशल्य , तंत्र,आणि भविष्यातील आव्हांना समोरे जाण्याचे बळ निर्माण करणेसाठी शिक्षक स्वत: आव्हान निर्माता आणि आव्हन सोडविण्याची क्षमता विकसित करणारा असावा. थोडक्यात शिक्षक हा प्रेरणेचा प्रकाश असावा.शिक्षक आदर्शांचा निर्माता व्हावा.शिक्षक ज्ञानाचा न आटणारा झुळझूळ झरा असावा.शिक्षक मार्गदर्शक दिपस्तंभ असावा. शिक्षक शिक्षक तंत्रस्नेही व्हावा.शिक्षक पर्यावरण प्रेमी असावा. शिक्षक ज्ञानरचिता असावा. शिक्षक विद्यार्थीप्रिय व विद्यार्थीपारायण तसेच ज्ञानपारायण असावा. शिक्षक, सुलभक, समीक्षक चिकित्सक आणि सृजनशील मनाचा असावा. शिक्षक शिस्तप्रिय क्षमाशील आणि कर्तव्यनिष्ठ असावा. शिक्षक शिलवान , क्षमताधिष्ठित आणि कष्टाळू असावा.
शिक्षकाची भूमिका ज्ञान देण्यापुरती मर्यादित नसून ती मार्गदर्शक, आदर्श , प्रेरणास्त्रोत आणि सामाजिक परिवर्तक अशी बहुआयामी आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवतात, त्यांना जबाबदार नागरिक बनवतात आणि त्यांच्या सामाजिक, भावनिक व बौद्धिक विकासाला चालना देतात, ज्यामुळे ते समाजात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. शिक्षक हे ज्ञानाचे दीपस्तंभ आहेत, जे विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश आणतात’, ‘शिक्षक हे दुसरे पालक आहेत, जे आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवतात आणि अनमोल मार्गदर्शन करतात’, ‘प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सर्वोत्तम गुण आणणाऱ्या शिक्षकांना मनःपूर्वक धन्यवाद!!!.
श्री गणेश नरोत्तम पाटील (स्नेहवलयकार)
पर्यवेक्षक, वल्लभ विद्यामंदिर पाडळदा
ता. शहादा, जि.नंदूरबार





