उमरेड विधान सभेत परिवर्तन होणारच – रश्मीताई बर्वै
उमरेड विधान सभेत परिवर्तन होणारच – रश्मीताई बर्वै
भिवापुर-
उमरेड विधान सभेत काँग्रेस पक्षाने प्रचार आणि प्रसार यामध्ये जोरदार मुसंडी मारलेली दिसत. संपुर्ण विधान सभेतील एक संघ काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांच्या खांद्याला खांदा लावुन प्रचारात रात्र- दिवस आपल्या परीने झटत आहे. पारवे बंधुनी केलेला मतदारां बरोबरचा विश्वासघात हा मतदारांना रुजलेला नाही. त्यामूळे मतदार संघात परीवर्तनाची मोठी लाट जनमानसात उसळलेली दिसत आहे.
महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. संजय मेश्राम यांचे प्रचारार्थ जि. प. मा . अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांची जाहीर सभा भिवापुर येथे पार पडली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, लोकसभेला बर्वे कुटुंबा सोबत विरोधकांनी सत्तेचा वापर करुन दगाफटका केला. अनुसूचित महिला असल्यानेच मला आणि कुटुंबातील सदस्यांना लोकसभेच्या निवडणुकीत त्रास देण्याचा पुरेपुर प्रयत्न झाला पन आमचा संवीधानावर असणारा विश्वास आणि जन सामान्यांचे प्रेम यामुळेच शामकुमार बर्वे लोकसभेत मोठ्या मताने निवडुन आले. सामान्य कुटुंबातील माणुस जनतेच्या आशीर्वादाने आज संसदेत आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बसला आहे. पारवे बंधूंनी स्वताःचे घर भरण्यासाठीच पंधरा वर्ष सत्ता उपभोगली. मागील पंचवार्षिक मधील माजी आमदार तर कधी ही स्थानिक लोकप्रतिनिधी यांना सोबत घेवून विकास कामाचे उद्घाटन कराण्यासाठी जात नव्हते ते फक्त ठेकेदार आणि आपल्या बगल बच्चे यांनाच सोबत घेवून उद्घाटन समारंभ पार पाडुन मोकळे होत असत आणि तेच फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमातून फिरवत असत. आता उमरेड विधान सभेत परिवर्तनाची लाट आली आहे शिक्षित आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असणारे, अभ्यासू उमेदवार पक्षाने या विधान सभेसाठी दिले आहे. त्या संधीचे सोन करावे आणि “पंजाला” मजबूत करून विधानसभेत मेश्राम साहेबांना पाठवावे.
तसेच यावेळी महा विकास आघाडीचे उमेदवार संजय मेश्राम यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, महा विकास आघाडीचे “पंचसुत्री” कार्यक्रमाने जनमाणसाचे कल्याण होणार आहे. काँग्रेस सरकारने नेहमी सामान्य जनतेला केन्द्र बिंदु माणुन कार्य केले आहे. उमरेड मतदार संघातील महिला, तरुण, उद्योजक यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध करुन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. विशेषतः महिला आणि मुलीसाठी शासनाच्या विविध योजना राबवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यावर भर देणार आहे. शेती व संलग्न व्यवसाय यासाठी प्रयत्नशील असणार आहे. यावेळी जि.प. सदस्य शंकर डडमल यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेत आपल्या अभ्यासू वकृत्वाने सभा गाजवली.
यावेळी जि, प, सदस्य शंकर डडमल, नेमावली ताई माटे, पं . समिती चे ममता शेडे, कृष्णा घोडेस्वार , राहूल मेश्राम , माधुरी देशमुख, कीरणताई नागरीकर ,लव जनबंधू, नगरपंचायत समिती चे सर्व सदस्य, याचप्रमाणे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य एसटी एसटी ओबीसी महिला सेल पदाधिकारी महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.



