
0
5
5
6
4
4
महाराष्ट्र भूमी
मंगल पवित्र महाराष्ट्र भूमी
करूया सारे जयजयकार
सह्याद्रीच्या कडेकपारीत
अमर शिवबाची तलवार…!!
जीवनाचे तत्वज्ञान सांगते
ज्ञानेश्वरांची थोर ज्ञानेश्वरी
पदस्पर्शाने पावन महाराष्ट्र
इथेच लीला घडल्या ईश्वरी..!!
फुले शाहू नि आंबेडकर
समाजासाठी झिजले सारे
मनामनात पेरले कायम
क्रांतिकारी विचारांचे वारे…!!
गड किल्ले नि अथांग दर्या
पर्यटन स्थळे आहेत छान
जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा
लेण्या पाहून हरपते भान..!!
मराठी साहित्यिकांची भूमी
काव्य गझल पोवाडा लावणी
शालिन सोज्वळ प्रेमळ बोल
माय मराठीची अमृतवाणी..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
=======
0
5
5
6
4
4



