Breaking
क्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“कृत्रिम प्रसाधनांचा बाजार… एक विकत घेतलेला आजार.”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 5 9 4 8 7

“कृत्रिम प्रसाधनांचा बाजार… एक विकत घेतलेला आजार.”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

असे म्हणतात की “हौसेला मोल नाही” ज्या गोष्टीची हौस आहे त्यासाठी एखादी व्यक्ती काय वाट्टेल ते करेल पण हौस पूरी करून घेईल. बर्‍याचदा हौसेचा संबंध पैशाशी जास्त येतो. कधी कधी पैशाअभावी मन मारावे लागते. पण म्हणतात ना “दुधाची तहान ताकावर” तसे अगदीच सिंगापूर, कॅलिफोर्निया नाही जमले तर काश्मीर, कन्याकुमारी तरी आहेच. तेही नाही जमले तर महाबळेश्वर तरी आहेच. अभिजात सौंदर्याचे वरदान लाभलेल्या स्रीला सुद्धा इतर संसाधने वापरून नटण्याची हौस भारीच. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत नखशिखांत शृंगार हवाच.. सोन्या चांदीचे दागदागिने, अगणित सौंदर्य प्रसाधने, रंगीत टिकल्या, लिपस्टीक, नेलपॉलिश, बांगड्या, पिना, चाप, ही यादी न संपणारी आहे.

विशेष म्हणजे आजकाल जसा ड्रेस किंवा साडी तशीच त्याला मॅचिंग इतर साधने हवीतच. आणि याच हौशी स्वभावाचे पद्धतशिरपणे मार्केटिंग करणार्‍या कंपन्या प्रचंड संख्येने बाजारात उपलब्ध आहेत. आपल्याच मालाचा खप होण्यासाठी जाहिरातीचे वेगवेगळे फंडे वापरून ग्राहकाला आकर्षित केले जाते. अवघ्या आठवड्याभरात काळ्याची गोरी करण्याची हमी देणारी फेअर अँड लव्हली.. वर्षभर वापरूनही कुणाला नाही पावली.. मग हा अट्टाहास कशाला? जे निसर्गाने दिले आहे तेच असली आहे.. त्याला बदलता येत नाही. उलट ते जपले पाहिजे.. आंतरीक प्रसन्नता असेल तरच बाह्यसौंदर्य देखिल खुलते.. याकरिता “सर्व सिद्धीचे कारण आधी मन करा रे प्रसन्न” हेच शंभर टक्के सत्य आहे.

काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेल्या चित्रात हाच विषय आलेला आहे. एका अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर गुलाबी रंगाची नेलपॉलिशची बाटली हवेत तरंगताना दिसते आहे. तसेच त्यातून सांडणारा द्रव रस्त्यावर साचला आहे. जो स्पष्ट उठून दिसतो आहे. आणि अत्यंत कुतुहल मिश्रीत नजरेने दोन तरुणी हे दृश्य पाहताहेत. प्रत्यक्षात ती बाटली हवेत नाही. बाटलीपासून जमिनीपर्यंत जो गुलाबी रंगाचा धारदार ओघळ दिसतोय, तोच त्या शिल्पाचा आधार आहे. संपूर्ण शिल्प एकच आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली ही एक जाहिरातीची / कलेची युक्ती आहे.

अशा प्रसाधनांचा बाजार म्हणजे विकत घेतलेला एक आजारच आहे. तरीही महिला वर्ग लिपस्टीक, नेलपॉलिश, वेगवेगळ्या क्रिम सारख्या वस्तू नित्यनेमाने वापरतात. अशी उत्पादने निर्माण करणार्‍या कंपन्या केवळ तुमच्या हौशी स्वभावाच्या भांडवलावर आपले उद्योग चालवतात. म्हणून कोणीही जे नाही ते दाखवण्यापेक्षा जे आहे ते जपावे.. सौंदर्याच्या व्याख्या बदलून पहाव्या.

आजच्या दिखाऊ, आभासी जगतावर भाष्य करणार्‍या या चित्राचा आधार घेत, हायकूच्या माध्यमातून खूपच सूचक संदेश देता येईल. किंबहुना यासाठीच तर हा अट्टाहास.. अशा विषयावर अत्यंत प्रभावी संदेश देणाऱ्या रचनांची बरसात होईल अशी अपेक्षा होती. सर्वांनी भरभरून लिहिते व्हावे. याच अपेक्षेसह सर्वांच्या भावी हायकू लेखनासाठी खूप सार्‍या शुभेच्छा..!!!

विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/ कवी/ लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे