केंद्रप्रमुख ‘नवनाथ ओमासे’ यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न
पुणे जिल्हा प्रतिनिधी
केंद्रप्रमुख ‘नवनाथ ओमासे’ यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न
पुणे/इंदापूर: केंद्रप्रमुख श्री. नवनाथ भागुजी ओमासे हे ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. यातील अठरा वर्षे त्यांनी केंद्रप्रमुख म्हणून काम केले. सेवानिवृत्त होत असताना काझड, कळस, न्हावी व पिंपरी या चार केंद्राचा पदभार त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला. या चारही केंद्रातर्फे शनिवार दिनांक १२/०४/२०२५ रोजी लासुर्णे येथे त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार मा. श्री. दत्तात्रय भरणे मामा यांच्या पत्नी सौ. सारिकामामी भरणे यांच्या हस्ते मानपत्र, विठ्ठल रूक्मिणीची प्रसन्न मूर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशालीताई प्रतापराव पाटील या होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अजिंक्य खरात साहेबांनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्याचा गौरवोल्लेख केला. कार्यक्रमास इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या चेअरमन सौ. संगिता पांढरेताई व सर्व संचालक मंडळ, इंदापूर शिक्षण विभागातील अधिकारी, चारही केंद्रातील सर्व शिक्षक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अनेक शिक्षक बंधू भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करत साहेबांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



