‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’
मुख्य संपादक:राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : निसर्गराजा📘*
*🔸सोमवार : ०३ / ०८ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*निसर्गराजा*
निसर्गराजा तुझ्या सानिध्यात येता नेहमी
किती प्रसन्न आणि निर्विचार होऊन जाते मनीं
शहरांत मात्र विचारांचेही प्रदूषण वावरते..
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
निसर्गराजा तुझी महिमा अपार
किती साहतोस प्रदूषणाचा भार
चुपचाप करतोस सर्वांवर वार
*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
तडफडली पाखरं भर उन्हात
पाडली घरटी वारे पावसात
निसर्गराजा कधी देशील साथ
*कुमारी.साक्षी देसाई, दौंड, पुणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
असे निसर्गराजा विराट सिंधू
अद्भूत अगम्य सामर्थ्याचा
मानव त्यातला इवला बिंदू…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
निसर्गराजा सृष्टीचा राखतोस समतोल
मानवावर उपकार तुझे अनमोल
चुकल्यावर हिशेब घेतोस बरोबर
*सौ सरला टाले*
*राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*निसर्गराजा*
निसर्गराजा देतो शिकवण, जगणे ठेव साधे,
घेता जितके देणे शिक, नाते राहो शुद्धे,
लोभ जळाला मनामधला, भविष्य फुले नित्ये.
*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
निसर्गराजा पर्यावरण ठेवतो संतुलन
अबाधित ठेवतो सर्वांचे आरोग्यधन
चला लावा एक झाड जबाबदारी घेऊन
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
निसर्गराजा भरभरून देतो
चराचरातील जीवसृष्टीला जगवतो
मानवाच्या हस्तक्षेपाने बिघडतो
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
आकाशाकडे डोळे लावून बसला बळीराजा
आतातरी कृपा कर रे निसर्गराजा
गरीबी तर पाचवीलाच पूजली आहे
*डॉ. संजय भानुदास पाचभाई*
*जिल्हा नागपूर*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
*निसर्गराजा*
निसर्गराजा तुझीच आहे किमया
पशुपक्षी मानवावर तुझी छत्रछाया
नको लावू आम्हां तरसाया
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌵💥🌵♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



