0
1
8
3
2
1
एक होती परी
साजिरी गोजिरी
एक होती परी
शुभ्र कापडात
आली माझ्या घरी
दिसायला सुंदर
रूप गोजिरवाणे
तिच्या ओठी सदा
आनंदाचे गोड गाणे
तिच्या पायात पैंजण
त्यांचा नाद भारी
स्वप्नात येऊनिया
हितगुज करणारी
झाली तिची माझी
अचानक ओळख
सुंदर क्षणांची मज
तिने दिली पारख
साद तिला पुन्हा
घालीन कधीतरी
अतिशय लाडकी
एक होती परी
सचिन पाटील
अलिबाग, रायगड
0
1
8
3
2
1