Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“आयुष्य सुगंधित करणारा ‘अत्तराचा दिवा’…!”; वैशाली अंड्रस्कर

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 3 0 1

“आयुष्य सुगंधित करणारा ‘अत्तराचा दिवा’…!”; वैशाली अंड्रस्कर

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

मित्र-मैत्रिणींनो, बघता बघता श्रावण संपला. श्रावणातील सणांची रेलचेल जाऊन नवरात्र आले. नवरात्र संपताच हळुच कोजागिरी पौर्णिमा येईल आणि पहाटेच्या नवथर दवांना घेऊन दिवाळी अंगणात उभी राहिल. प्रत्येक सण मानवी जीवनाच्या आणि ऋतूंच्या भावबंधात गुंफलेले.

रोज मावळून पूर्वांचली उगवणारा सूर्य जसा नवी आशा नवी उमेद घेऊन येतो त्याचप्रमाणे हे सणवार मानवी मनातील दुःखाचे मळभ दूर सारून निरभ्रतेने जगण्यास बळ देणारे. त्यात दिवाळसण म्हणजे तर सणांचा राजा. दीपावली… अर्थात दिव्यांच्या ओळी…इवलीशी पणती कापसाच्या वातीला तेलात भिजवून अंधारातील कोपरा कोपरा उजळणारी… आणि अस्तास गेलेल्या सूर्याला खात्री देणारी…तू निश्चिंत राहा…मी आहे इथेच या तमाला दूर सारण्यास तू उद्या येईस्तोवर….!

हा दिवा…ही पणती जेव्हा तेलाने उजळते तेव्हा प्रकाश पडतो…पण आपल्या मराठीचे शिलेदार समूहात ‘अत्तराचा दिवा’, उजळतो तेव्हा काय होते ? किती सुंदर कल्पनाविलास…पण हा कल्पनाविलास न मानता आयुष्याला सुगंधित करणारा जादुई दिवा झाला तर….! समूहाचे मुख्य प्रशासक माननीय राहुल दादा पाटील जेव्हा असे नाविन्यपूर्ण विषय देतात तेव्हा लेखणीचा कस लागतो.

आपण बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात एक धडा शिकलेले आहोत. एक उधळ्या पुत्र आणि एक विचारी पुत्र या दोघांना संदेश देण्यासाठी वडिलांनी दिलेले आव्हान….की मी दिलेल्या पैशांनी तुम्ही तुमची खोली भरून दाखवायची. उधळ्या पुत्र वेगवेगळ्या वस्तूंनी त्याची खोली भरण्याचा प्रयत्न करतो आणि विचारी पुत्र अगरबत्तीच्या सुगंधाने खोली भरून शांतपणे अभ्यास करत बसतो. असाच काहीसा हा ‘अत्तराचा दिवा’, तेलाचा दिवा तर प्रकाशाने आसमंत उजळून टाकतो पण अत्तराचा दिवा आयुष्य सुगंधित करून जातो. दुःखी कष्टी, दीनदुबळ्या लोकांच्या आयुष्यात हा ‘अत्तराचा दिवा’ उजळणे सोपे नव्हे. ही किमया करणाऱ्या सुपुत्रांची भारतभूमीला वानवा नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर स्वातंत्र्योत्तर काळातही असे अनेक महामानव या भूमीने बघितले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, संरक्षण अशा विविध क्षेत्रात ‘अत्तराचा दिवा’, उजळणाऱ्या तमाम भारतवासियांना माझे शत शत नमन….!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

3.3/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे