Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

मतदार राजा

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 9 3

मतदार राजा

ऐक मतदार राजा
तुझा दिवस आजचा
सारासार विवेकाने
नेता निवड उद्याचा.. //

हीच खरी संधी असे
चोखंदळ वृत्ती ठेव
भोवताली उठतेय
भले अफवांचे पेव.. //

वारेमाप आश्वासने
लाख वादे करतील
स्वार्थी नेते घरे दारे
स्वतःचीच भरतील.. //

अशा भ्रष्ट प्रवृत्तींचा
कर आता बंदोबस्त
राजकीय क्षेत्रातून
कर कायमचा अस्त.. //

लोकशाही रक्षणाचा
तूच एकमेव धागा
ज्याची त्याला मिळू दे
तुझ्यामुळे योग्य जागा.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे