Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय बहु विद्याशाखीय परिषदेचे आयोजन

हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार परिषद

0 5 1 6 4 1

आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय बहु विद्याशाखीय परिषदेचे आयोजन

हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार परिषद

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २३ मार्च) हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ मार्च रोजी सोमवार व मंगळवारी हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय ताजाबाग शरीफ, उमरेड रोड, नागपूर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न होणार आहे.

मानव्यशास्त्रे, सामाजिक शास्त्रे, वाणिज्य, व्यवस्थापन व शुध्द विज्ञानातील समकालीन समस्यांवर चर्चा करून मार्ग काढल्यास नवकल्पनाचलित शाश्वत दृष्टीकोन विकसित होवून विद्यार्थ्यांचे भविष्याला कसा आकार देता येवू शकतो यावर उहापोह करण्यासाठी चार महाविद्यालये मिळून ही राष्ट्रीय परिषद आयोजीत केली जात आहे.

कला व वाणिज्य महाविद्यालय ताजाबाद शरीफ, उमरेड रोड, नागपूर, अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, अडयाळ जि.भंडारा, मारीया कला व विज्ञान महाविद्यालय देवळी जि.वर्धा आणि उम्मे-सलमा कला व विज्ञान महाविद्यालय, हंसापूरी नागपूर यांनी संयुक्त विद्यमाने ही परिषद शाश्वत विकासाचे उद्दीष्ट ठेवून आयोजीत करण्यात आली आहे.

शहरी आणि ग्रामीण, शैक्षणिक व समग्र दृष्टिकोन यांचा मेळ घालून परंपरागत शिक्षणाच्या मर्यादा ओलांडण्याचा मानस परिषदेच्या मुख्य निमंत्रकांनी बोलून दाखविला. या दोन दिवसीय आराखड्यामध्ये पूर्णसत्र अधिवेशन, संशोधन, निबंध वाचन, सादरीकरण व परस्पर संवाद यावर भर देण्यात येईल.

या राष्ट्रीय मेळाव्याच्या प्रथम दिवशी २३ मार्चला सकाळी ९ ते १०.३० यावेळेत नोंदणी व अल्पोपहार राहील. परिषदेचे उद्घाटन महाराट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मा. प्यारे खान करतील. राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर या सत्राचे अध्यक्षा असतील. तसेच उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण हे प्रमुख अतिथी असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अ.शकील अ.सत्तार प्रास्ताविकपर भाषण करतील.

त्यानंतर दोन तांत्रिक सत्र असतील ज्यामध्ये ग्रॅजुएट स्कूल ऑफ बिझनेस, इंदोर येथील प्रमुख वक्त्या प्राचार्या डॉ. शिखा अग्रवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. या सत्राचे अध्यक्ष सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाचे अधिव्याख्याता व वाणिज्य मंडळाचे अधिष्ठाता मा. डॉ. तुषार चौधरी राहतील. दुसऱ्या तांत्रिक सत्राचे मुख्य वक्ते विज्ञान मंडळाचे अधिष्ठाता डॉ. उमेश पालीकुंडवार राहतील. या सत्राचे अध्यक्ष प्रेरणा महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रविण जोशी राहतील.

दूसऱ्या दिवशी २४ मार्च २०२६ रोजी पहील्या सत्राचे मुख्य व्याख्याता, लक्ष्मीनारायण तांत्रिक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नीरज खटी असतील, या सत्राचे अध्यक्ष विमेन्स कॉलेज नंदनवन येथील प्राचार्य डॉ. मिलिंद गुल्हाणे यांच उपस्थिती राहतील. दुसऱ्या तांत्रिक सत्राचे मुख्य व्याख्याता पद मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी हे भुषवतील. धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अखिलेश पेशवे हे अध्यक्ष पद ग्रहण करतील.
परिषदेचा समारोप सोहळा दुपारी २.३० वाजता. आमदार अँड. अभिजीत वंजारी नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.

विशेष अतिथी म्हणून शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले असतील. इतर सन्माननीय अतिथींमध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, होमी भाभा विज्ञान संस्था, मुंबईच्या प्रा. डॉ. अर्चना नेरकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संचालक डॉ. विजय खंडाळ राहतील. या शैक्षणिक मेळाव्यात २५० संशोधकांनी नोंदणी केली आहे. तसेच काही उत्तम, निवडक शोध निबंध हे मानांकीत जनरल मध्ये छापले जातील अशी माहिती प्रमुख आयोजक डॉ. अ. शकिल अ.सत्तार यांच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे