Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

न्यु मून कॉलेजचा विद्यार्थी खुशाल बुरले याची राज्यस्तरावर निवड

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

न्यु मून कॉलेजचा विद्यार्थी खुशाल बुरले याची राज्यस्तरावर निवड

तबला वादन स्पर्धेत जिल्हा स्तरावर ठरला अव्वल

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

गोंदिया: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी खुशाल महेंद्र बुरले इयत्ता ११वी हा तबला वादन स्पर्धेत अव्वल ठरला.

तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा पुंजाबाई पटेल अध्यापक विद्यालय गोंदिया या ठिकाणी घेण्यात आली.
यावेळी उत्कृष्ट तबला वादक म्हणून खुशालला प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

तसेच चित्रकला स्पर्धेत व्यंगचित्र उपप्रकारात तन्वी प्रकाश रुखमोडे इयत्ता १२ वी या विद्यार्थिनीने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. कु. सोनल नेवारे इ. ११वी ही हार्मोनियम स्पर्धेत उत्कृष्ट तर इयत्ता ११ वीच्या पाच विद्यार्थीनीं लोकनृत्य स्पर्धेत उत्कृष्ट ठरल्या. न्यु मून काॅलेजमध्ये नेहमीच मुलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहीत केले जाते.

विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी शाळेतर्फे यशवंत परशुरामकर, ओमप्रकाशसिंह पवार ,गिरीश पालीवाल, भाऊराव पत्रे ,संजयसिंह पवार ,संतोष बुकावन, राधेश्याम भेंडारकर या संचालक मंडळाने तथा राकेश उंदीरवाडे, तारका रुखमोडे, त्रिवेणी थेर, प्रतीक्षा डोंगरवार यांनी खुशाल बुरले, तन्वी रुखमोडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. तसेच सर्व शिक्षकवृंदांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे