
0
4
8
2
9
0
आयुष्य हे
आयुष्य हे असंच असतंय
कधी सुख,कधी दुःख येतं
आलेला प्रत्येक क्षण टिपत
जीवनभर जगायचं असतं
आनंदाचे क्षण येता साजरे
करायचे वेळ प्रसंग पाहून
दुःख आलेच वाट्याला तरी
जायचे नाही अवसान गळून
हुरळून जायचे ना कदापी
आनंदी क्षण आलेले पाहून
दुःखातही स्वतःचे अस्तित्व
शाबीत ठेवायचेच टिकवून
निरोगी,निरामय आयुष्याचे
करायचे सांगोपांग ते जतन
योग्य आहार,विहार करावा
तब्बेतीचे करा स्वतः रक्षण
आयुष्य हे पुन्हा ना थोडेचं
लाभले ते भरभरून जगावे
प्रेम,जिव्हाळा द्यावा घ्यावा
ऋणानुबंधाचे नाते जपावे
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
9
0



