
0
4
8
2
8
4
एक भेट चांदोबाशी
निळ्या निळ्या आभाळत
चांदोबाच घर
धरणीपासून आहे
खूपच दूरवर….
गोल मटोल चांदोबा
बसून रथावर
नजर त्याची
असायची माझ्यावर…
रोज बघायचा मला
लिंबोणीच्या आडून
हसायचा गालात
शुभ्र ढगाच्या मागून….
भेट घ्यावी चांदोबाशी
यायचे रोज मनात
उंच सीडी चढून
वाटे जावे आकाशात….
विचारात असतांना
मिटले डोळे हळूच
स्वप्नात पोचलो आभाळात
उंच सीडी चढून…..
आनंदाला सीमाच नव्हती
चांदोबाचे घर बघून
आकाशगंगा पाहिली
इंद्रधनू रथावरून….
चांदोबाशी खेळताना
खुप मजा आली
एक भेट चांदोबाशी
अशी स्वप्नात घडली.
इंदू मुडे
ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर
0
4
8
2
8
4



