Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे ‘हसरे भाग्यांक ‘ पुस्तक प्रकाशित

वसुधा नाईक पुणे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे ‘हसरे भाग्यांक ‘ पुस्तक प्रकाशित

वसुधा नाईक पुणे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे; ( दि १६) : पुण्यनगरीत एम प्रकाशनतर्फे सुप्रसिध्द व्यंगचित्रकार आणि अंकज्योतिषशास्त्र तज्ञ डॉ.मधुसूदन घाणेकर लिखित ‘हसरे भाग्यांक’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ ज्योतिर्विद पंडित विजय श्रीकृष्ण जकातदार यांच्या हस्ते (दि १४) करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधर पाटील तसेच जकातदार कुटुंबीय मंडळी उपस्थित होती.

पुस्तकाचे प्रकाशन करताना विजय जकातदार म्हणाले की अंक ज्योतिष शास्त्राच्या आधारे भाग्यांक व जन्म तारखेच्या बेरजेवर आपल्याला जीवनाची दिशा मिळू शकते आणि ही दिशा या पुस्तकात व्यंगचित्र आणि अंकज्योतिष शास्त्र यांची परस्परांवी सांगड घालून मिष्किल आणि मार्मिक पध्दतीने सांगण्यात आली आहे.

डाॅ.मधुसूदन घाणेकर हे ध्येयवेड्या व्यक्ती असून त्यांचे हे “हसरे भाग्यांक ‘ हे पुस्तक 263 वे आहे हे विशेषत्वाने नमूद करावे असे वाटते. भविष्यकाळात त्यांच्याकडून असेच समाज उपयोगी कार्य व्हावे असे पंडित विजय जकातदार यांनी डाॅ.घाणेकर यांना सदिच्छा देताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे