Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजीनगरसाहित्यगंध

मोकळ्या नभी

विष्णू संकपाळ बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर

0 6 6 7 2 6

मोकळ्या नभी

स्वबळावर घे भरारी
मुक्त मोकळ्या नभी
कळू दे सर्व जगाला
रे तुझ्यातलीही खूबी… //

सुवर्ण पिंजर्‍याची या
का लागली तुज गोडी
सक्तिची ही कैद वेड्या
का कळेना तुला थोडी… //

मुक्त श्वास घेण्या जरा
तोड पायातली बेडी
जगेन येथे सुखात मी
सोड आशा ही वेडी… //

आकुंचले विश्व तुझे
मारूनी बैसला दडी
संकोचले धैर्य सारे
ना साहस घेण्या उडी… //

झुगार परावलंबित्व
जिगर दाखव रांगडी
आठव सखे सोबती
वाट पाहती पैलथडी… //

विष्णू संकपाळ
बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 6 7 2 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे