
0
4
0
9
0
3
काय गुन्हा तिचा
काय गुन्हा तिचा
शेतकऱ्याची ती पोर
दिवस रात्र जागून
जीवा लावी अभ्यासाचा घोर
उच्चविद्याविभूषित झाली
माय बापाच्या उन्हातान्हावर
पांग फेडला कष्टाचा
गेली मेडिकल ऑफिसरच्या पदावर
नसे जाणीव समाजा
कोण लढणे झगडणे आले
दबाव तंत्र अन् समाजव्यवस्था
कळीच्या जीवावर बेतले
रक्षकच बनले भक्षक
कशी सहावी यातना
महाराष्ट्र देश हळहळला
कशा साहिल्या त्या वेदना
कुठे हिंडावे न्यायासाठी
गरीब बापडे मायबाप
तळहातावरील फोड त्यांच्या
प्रामाणिकपणा ठरला हो शाप
असुरक्षित का इथे
प्रत्येक तनया देशाची
कोणत्या विश्वासावर जन्म द्यावा
शोकांतिकाच ही भारताची
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जिल्हा बीड
0
4
0
9
0
3





