
0
4
0
9
0
3
कासवगती
कासवगती
धीमी चाल
दाखवत असते
आपली कमाल
कासव आपला
हळूहळू पळतो
असतात आखूड पाय
थोडा थकून जातो
तरी पण तो
लावतो शर्यत
थांबत नाही कुठे
जिंकेपर्यंत
कासव बिचारा
असतो लहान
अक्कल हुशारीने
असतो महान
पाठीवरचे कवच
असते मजबूत
सोसून घेतो मारा
आहे तो अद्भुत
गोजिरवाणा दिसतो
टकूर टकूर पाहतो
दया येते त्याची
मन हेलावून जाते
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
4
0
9
0
3





