जि.प.शाळा कळस येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप
नेचर डिलाईट डेअरी अँड डेरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर यांचे लाभले सहकार्य
जि.प.शाळा कळस येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप
नेचर डिलाईट डेअरी अँड डेरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर यांचे लाभले सहकार्य
तालुका प्रतिनिधी इंदापूर
पुणे/इंदापूर: जून महिन्यात शाळा सुरू झाल्या नि पुणे जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा. श्री. संजय नाईकडे साहेबांनी समाजातून लोकसहभाग मिळवण्याचे आव्हान केले. याचाच एक भाग म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ओमासे मॅडम यांनी नेचर डिलाईट डेअरी यांच्याकडे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळावे यासाठी आवाहन केले.
कंपनीने लगेच याची दखल घेऊन शिलाईसाठी दफ्तर टाकून केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला. आज रोजी शाळेत कंपनीचे डायरेक्टर श्री. सुजित देसाई व श्री. सोहम देसाई, कंपनीचे एच आर विभागाचे जनरल मॅनेजर श्री.संदिप शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांचे वाटप करण्यात केले.
याकामी शाळेस नेहमीच सहकार्य करणारे पालक श्री. कैलास कांबळे यांनी बहुमोल सहकार्य केले. यावेळी पालक श्री. बापू कांबळे, मुख्याध्यापिका सौ. ओमासे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक श्री. डोळे सर, श्री. धायतोंडे सर, श्री. शिंदे सर, श्रीम. घुगे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मराडे सरांनी केले व आभार श्रीम. आटोळे मॅडम यांनी मानले.



