डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कुल ने पटकावली डिस्ट्रिक्ट स्काउट्स आणि गाईड्स चॅम्पियनशिप ट्रॉफी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कुल ने पटकावली डिस्ट्रिक्ट स्काउट्स आणि गाईड्स चॅम्पियनशिप ट्रॉफी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (दि २१); दिनांक १६/०१/२०२५ ते १९/०१/२०२५ या कालावधीत संपन्न झालेल्या ४१ व्या जिल्हास्तरीय स्काउट्स आणि गाईड्स मेळावा २०२५ मध्ये अलीबाग तालुक्यातील डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कुल च्या विद्यार्थ्यांनी जुनीयर व सीनीयर दोन्ही गटात पहिला क्रमांक पटकावून रायगड जिल्ह्यात आपल्या शाळेचे नाव उंचावले आहे.
याच मेळाव्यात बेस्ट स्काउट आणि बेस्ट गाईड या मानकऱ्यांचा किताब अनुक्रमे कुमार वृषल कटवते आणि कुमारी जान्हवी माने यांनी पटकावला असून त्यांनीही आपल्या शाळेचा गौरव वाढवला आहे.
रायगड जिल्ह्याचे पहिले रोव्हर आणि रेंजर कुमार मिहीर म्हात्रे, कुमार मीत राजशिर्के, कुमारी स्वरा कदम आणि कुमारी रिद्धी सुतार हे चौघेही डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कुल चे माजी विद्यार्थी आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पाठिंबा देणारे शिक्षक म्हणजे त्यांच्या स्काउटर प्रशांत भगत, धिरेश म्हात्रे आणि गाईडर नेहा कांबळे. या तीनही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे व त्यांच्या शाळेचे नाव उंचावले आहे.



