ई-पेपरकविताखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशसाहित्यगंध
सत्वपरीक्षा
सुजाता सोनवणे. सिलवासा दादरा नगर हवेली.
0
1
8
4
4
1
सत्वपरीक्षा
जीवनाच्या या रंगमंचावर
पावलोपावली सत्वपरीक्षा
सत्याचीच कसोटी जास्त
घ्यावी लागते संयमाची दीक्षा.
कलियुगात नराधमांचा विविध
रूपांत फोफावला आसुरी माज
सदसद्विवेकबुद्धी गहाण ठेवून
अहंकारी सोडतात सर्व लाज.
अशानांच मिळतोय आजकाल
जागोजागी यथोचित मानसन्मान
मात्र विसरू नको रे दुष्ट मानवा
देवाला आहे सर्व गोष्टींची जाण.
कर्तव्यदक्ष राहून जागव सदा
अंतर्मनात तुझा अभिमान
शेवटी एक दिवस सत्यमेव जयते
आहेच आपले राष्ट्रीय ब्रीद महान.
खचून जाऊ नकोस तू कर्मयोगी
होऊ दे पुन्हा पुन्हा सत्वपरीक्षा
यातूनही आपसूकच रूंदावतील
तुझ्या धीरोदात्त संयमाच्या कक्षा.
सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.
0
1
8
4
4
1