0
1
8
4
6
4
आसुसला बळीराजा
आरे बरस तू मेघा
असा अंत नको पाहू
वाट पाहून थकलो
दूर नको तू रे जाऊ
जर जाशील निघुनी
सुखे अंतरी ओलावा
तुझ्या विना रे पिकांना
कसा फुटेल पालवा
दुष्काळाच्या सावटाची
चाहूल लागली जनाला
ये रे धावत पळत
थोडा रिझव मनाला
ये रे त्वरित निघून
पिकं पडले धरणी
वाट पाहता पाहता
तेज गेलं ओसरूनी
रुसू नको रे तू मेघा
काया पडली पिवळी
कसा पोसे मी जगाले
निघून गेलास अवेळी
किती धावा घालू आता
घशा कोरड पडली
विश्वासून बसल्याची
आम्हा अद्दल घडली
दिनकर झाडे
गडचांदूर, जि चंद्रपूर
0
1
8
4
6
4