0
1
8
4
6
2
सत्वपरीक्षा
रोज असते सत्वपरीक्षा
जीवन जगत असताना
संयमाने होते उकल
नवे आव्हान पेलतांना ॥
शब्दांनाही द्यावी लागते
प्रत्येक अक्षराची सत्वपरिक्षा
ध चा मा होतो तेव्हा
बदले इतिहासाचा नक्षा ॥
जगण्यासाठी पशूपक्षांचीही
असते रोजच सत्वपरीक्षा
करून मात संकटावरती
अन् प्राणांची होते रक्षा ॥
निसर्गालाही जावे लागते
सत्वपरिक्षेच्या दिव्यातून
कधी सुबत्ता कधी दुष्काळ
अन् मानवाच्या याचनेतून ॥
तावून सुलाखून निघते
सत्यही जेव्हा अग्निपरिक्षेतून
उतरावे लागते कसोटीला
सत्वपरीक्षेत उत्तीर्ण होऊन ॥
गंगामायही होरपळतेय
शवांच्या ढिगाऱ्यातील राखेने
संस्कार आणि माणुसकी
कर्मकांडाच्या अग्नीज्वालेने ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
1
8
4
6
2