Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

वेळ

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 3 0 1

वेळ

वेळे इतके किमती
अन्य कांहीच नसते
येथे जन्म मरणही
वेळे अधिन असते.. //

चक्र उदय अस्ताचे
कसे अचूक चालते
रात्र असो की दिवस
कोण सांगड घालते.. //

एकामागे एक ऋतु
येणे जाणे क्रमवार
नसे कधी मागे पुढे
कोण याचा सूत्रधार.. //

बीज रूजणे उगणे
होते कसे आयोजन
त्याचे फुलणे फळणे
कोण करी नियोजन.. //

जीव जंतू वनस्पती
पशूपक्षी लाख जाती
र्‍हास असो की उत्पती
ताळ मेळ कोणा हाती.. //

प्रश्न असले हजार
ज्याचे उत्तर एकच
सर्व तिच्या बंधनात
फक्त असे ती वेळच.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे