Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

नागपूरमध्ये शहाकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा मोठा घोटाळा उघड होणार ?

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

0 5 3 4 0 0

नागपूरमध्ये शहाकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचा मोठा घोटाळा उघड होणार ?

लेखापरीक्षण अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती !

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : (दि ९ एप्रिल) नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शहाकार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सहकारी संस्था मर्यादित यांच्या.विरोधात मोठ्या गैरव्यवहाराचे संकेत समोर आले आहेत. लेखापरीक्षण अहवालातून उघड झालेल्या माहितीनुसार, या सोसायटीने नियमांचे उल्लंघन करत हिंगणा तालुक्यातील मौजा वानाडोंगरी व वागधरा परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे.

नियमांनुसार, मनपा कार्यक्षेत्रातील सोसायटींना बाहेरील ग्रामीण भागात मालमत्ता खरेदी-विक्री करता येत नसताना देखील, संबंधित संस्थेने पटवारी हलका क्रमांक ४६, खसरा क्रमांक ३१, क्षेत्रफळ १ हेक्टर ४८ आर जमीन प्रमोद केजोडीमल अग्रवाल यांना तब्बल १ कोटी त्र७३ लाख रुपये किंमतीत विक्री करार केला. या व्यवहारात त्यांचेकडून ७३ लाख रुपये अॅडव्हान्स घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

तसेच, या व्यवहारातून मिळालेल्या रकमेवरून मौजा वानाडोंगरी येथील खसरा क्रमांक ५ मधील जमीन खरेदीसाठी ५५ लाख २५ हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचेही लेखापरीक्षणात नमूद आहे. मात्र, ज्यांच्या नावाने करार करण्यात आला त्या प्रकाश संपतरावजी शहाकार नावाचा व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित गावात प्रकाश भाऊराव शहाकार आणि प्रकाश रुपरावजी शहाकार अशी नावे असलेले व्यक्ती वास्तव्यास आहेत. यामुळे सोसायटीने खोट्या नावाचा वापर करून जिल्हा निबंधक कार्यालयाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

या प्रकरणाबाबत महसूल मंत्री, सहकार मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे अनेक तक्रारी प्रलंबित असून, आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा निबंधक अजय कडू यांनी या प्रकरणात सखोल चौकशी केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, अशी मागणी होत आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे