
0
5
5
8
5
8
ऋतुचक्र
सोडून साथ तुझी,
पानगळ झाली,
उभ्या सांगाड्याची,
स्तब्ध सावली….१
उन्हाळे पाणकळे
ऋतू मनात साचले
आठवांचे उमाळे
नयनी दाटले…..२
झडला उत्सर्ग
तम सोडून,
देहाचे झाले
गर्व हरण….३
ऋतुचक्र
चाले निरंतर,
जगण्याची उभारी
देई चराचर….४
सांजच्याला जरी
काहूरली सांज,
फांदीला फुटून कोंब
सांगे जीवनाची गाज….५
काशीनाथ पैठणकर
जिल्हा नाशिक
0
5
5
8
5
8



