
0
4
8
2
8
4
दगडावरची रेघ
बाह्यसौंदर्य नसतंय
चिरकाल टिकणारे
अंर्तसौदंर्यच असावे
नेत्रज्योती दिपणारे
दगडावरची रेघ ही
मिटून जाते पावसात
फलप्राप्ती रे कशी ?
दगडाच्या रे नवसात ?
सामंजस्याची रे रीत
हृदयात फुलवते प्रीत
निकोप दृष्टी रे ठेऊन
मनसोक्त गा जीवनगीत
दागिना हा सदाचाराचा
शोभतोय सदा कपाळी
दगडावरची रेघ पुसून
बसू नये चिखलात फसून
ऊब मायेची काळजात
गुंफत असते रे स्नेहबंध
गंध सद्गुणांचा सुटू दे
स्वानंदात होऊ नको अंध
काळजावरच्या रे भेगा
मिटव गुंफून नात्याची वीण
काळ्या दगडावरची रेघ
म्हणून मनानं बनू नको दीन
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
4
8
2
8
4



