प्रभाकर राघव पाटील [आप्पा ] यांचे दुःखद निधन
आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे ते माजी सचिव होते
प्रभाकर राघव पाटील [आप्पा ] यांचे दुःखद निधन
आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे ते माजी सचिव होते
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: आ.सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे माजी सचिव व बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी वरिष्ठ लिपिक प्रभाकर राघव पाटील [ आप्पा ] यांचे शुक्रवार दि. २ अॉगस्ट २०२४ रोजी रात्री १२.३० वाजता आवास [ कवळे आळी ] येथील राहत्या घरी वयाच्या ८३ व्या वर्षी आजाराने दुःखद निधन झाले.
सकाळी १०.०० वाजता आवास येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि. ११ अॉगस्ट २०२४ रोजी आवास येथे सकाळी ९.०० वाजता होणार आहे.
प्रभाकर राघव पाटील [आप्पा ] बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये दि. १ जून १९६३ पासून कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले. त्यानंतर पुढे ते वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. एकूण ३६ वर्षे ५ महिने सेवा करून ते दि.३१ अॉक्टोबर १९९९ रोजी सेवा निवृत्त झाले.
सेवानिवृत्ती नंतर पुढे ते १० वर्षे आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने एक प्रेमळ, शांत, संयमी, प्रामाणिक,अभ्यासू, व कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने आवास गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, तीन मुली, तीन जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या आत्म्यास चिरःशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!





