Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

युवा महोत्सवात जे. एस. एम. चा जल्लोष

रायगड (दक्षिण) विभागात पटकावली सर्वाधिक पारितोषिके

0 4 8 2 9 0

युवा महोत्सवात जे. एस. एम. चा जल्लोष

रायगड (दक्षिण) विभागात पटकावली सर्वाधिक पारितोषिके

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

रायगड: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय, कोलाड येथे गुरुवार, दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित युवा महोत्सवाच्या रायगड (दक्षिण) जिल्हास्तरीय फेरीत एकूण १९ स्पर्धांमध्ये यश संपादन करून जे. एस. एम. महाविद्यालयाने रायगड (दक्षिण) विभागात सर्वाधिक पारितोषिके पटकावण्याचा सन्मान प्राप्त केला.

युवा महोत्सवात अलिबाग, पेण, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, सुधागड या तालुक्यांतील २५समहाविद्यालयांतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, मेहेंदी, मूर्तीकला, कोलाज, कार्टूनिंग, चित्रकला, रांगोळी अशा विविध प्रकारच्या ३२ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

जे. एस. एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण २८ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यापैकी वक्तृत्व (मराठी), कथाकथन (मराठी), स्कीट (मराठी), चित्रकला, माइम (मूकनाट्य) या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक, लोकनृत्य, समूहगीतगायन, एकपात्री अभिनय (हिंदी), शास्त्रीय वाद्यवादन, शास्त्रीय गायन, रांगोळी, मूर्तीकला, सुगम संगीत गायन या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक; तर कथाकथन (हिंदी), वक्तृत्व (इंग्रजी), नाट्यसंगीत या स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक आणि वादविवाद, कोलाज, शास्त्रीय नृत्य या स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ अशी एकूण १९ स्पर्धाप्रकारांमध्ये पारितोषिकांची लयलूट करत जे. एस. एम. महाविद्यालयाने रायगड (दक्षिण) विभागात आपला दबदबा कायम राखला. कु. श्रेया अधिकारी हिने सहा स्पर्धांमध्ये सहभाग घेत चार स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त केली.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व मुंबई विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे