
0
5
1
6
5
1
दिलखुलास
तुझ्या दिलखुलास बोलण्याने
दु:ख विरते माझे घटकाभरी
फुलते ज्योत अंतरी प्रीतीची
नि पापण्यात विरते विराणी
तुजसवे दिलखुलास हितगुज
काळजास बिलगे एकेक सूर
झंकारते हृदयाचं स्पंदन
त्यावर मनाचं मुक्त विहंगम
असंच राहा दिलखुलास सख्या
जगण्याची हीच तर क्षण सार्थकता
तारका रुखमोडे
अर्जुनी जि. गोंदिया
========
0
5
1
6
5
1



