७७ व्या प्रजासत्ताक दिन विशेष उपक्रमाने केला साजरा
वसुधा वैभव नाईक,प्रतिनिधी पुणे बिनधास्त न्यूज नेटवर्क
७७ व्या प्रजासत्ताक दिन विशेष उपक्रमाने केला साजरा
वसुधा वैभव नाईक,प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे (प्रतिनिधी) आज दि. 26/01/2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 8.00 वाजता पुणे ग्रामीण विभाग – पाषाण या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमाला हजर राहिले. माझा मित्र शिवहरी जंगले PSI Officer ग्रामीण विभाग याच्या मुळे ही संधी प्राप्त झाली.
मनःपूर्वक धन्यवाद तुझे. तिथून घरी आले 9.30 वाजता तर एक मोठे सरप्राईज माझ्यासाठी होते. माझ्या सोसायटीमध्ये मला ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो तिथे माझ्या हस्ते ध्वजावंदन केले हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. कधीतरी आपल्या हातून सुद्धा ध्वजावंदन व्हावे हे खूप वाटायचे मनातून आणि आज ते ड्रीम्स पूर्ण झाले. सोसायटी कमिटीची मी आभारी आहे. त्यांनी मला एवढा मोठा सन्मान दिला,माझ्या कार्याचा आढावा घेऊन हा बहुमोल सन्मान केला.
ठीक 11. 00 वाजता पुढील कार्यक्रमासाठी बाहेर पडले पडले. कात्रज येथील रात्र शाळा जी शाळा योगेश हरणे आणि त्याचे मित्र चालवतात. त्या शाळेमध्ये छोट्या छोट्या मुलांसाठी कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. प्रभात फेरी मारून मुलांना प्रभात फेरी म्हणजे काय हे समजावून सांगितले. मुलांना खाऊ दिला.तेथील शिक्षकांना’ कहाण्या ज्ञानदीपांच्या ‘ हे पुस्तक गिफ्ट केले. मनःपूर्वक धन्यवाद योगेश हरणे.
आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपल्यानंतर मी २५ साड्यांचे वाटप केले. सामाजिक कार्याची ही संधी मी सोडली नाही. संध्याकाळी सोसायटीमध्येच सोसायटीतील मुलींचा भजनाचा कार्यक्रम होता त्याचा आस्वाद देखील घेतला. अशाप्रकारे आजचा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने खूप सुंदर साजरा झाला.



