
0
6
3
0
9
2
विजयादशमी
विजयादशमी सणाला
लुटूया सोने विचारांचे
दहन करुया दुष्टप्रवृत्ती
सीमोल्लंघन करु दुष्कृत्यांचे
मतभेद मनभेद मिटवून
सुविचारांची पेरणी करुया
सर्वधर्मसमभाव राखत
दोस्तांनो चला सोनं लुटुया
कलहाचे जहर पेरती त्या
समाजद्रोहीस ओळखावे
नको सहारा अपप्रवृत्तींना
वेळीच त्यास ठेचून काढावे
विचार आचार उच्चारातून
दावू जगाला इथली एकी
दसऱ्याच्या शुभमंगल दिनी
अवगुणांची करु वजाबाकी
विजयादशमी सण मोठा
स्मरण करुया बळीराजाचे
अभिमान वाटे सैनिकांचा
वंदन तयांना सकल भारतभूचे
बळवंत शेषेराव डावकरे
ता. मुखेड, जिल्हा नांदेड
0
6
3
0
9
2



