Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

माझा शिवबा राजा

डॉ. पद्मा जाधव-वाखुरे छ.संभाजीनगर

0 4 8 3 0 1

माझा शिवबा राजा

स्वराज्याचा वाली झाला
माझा शिवबा राजा रं
सरली रात्र काळोखाची
आलं सुखाचं हे राज रं
राज्याभिषेक सोहळा छान
महाराष्ट्राच्या मातीची शान ..१

स्वराज्याच बांधलं तोरण
माझ्या शिवबा राजनं
सोहळा भाग्याचा पाहून
फिटलया डोळ्याचं पारणं
राज्याभिषेक सोहळा छान
महाराष्ट्राच्या मातीची शान ..२

32 मनाचं शोभे सिंहासन
नाणे निर्मियले शिवराई होन
राजमुद्रा ही मराठी खुण
मोहोर ठरली आमचा अभिमान
राज्याभिषेक सोहळा छान
महाराष्ट्राच्या मातीची शान ..३

सोहळ्याचा काय तो थाट
अधिस्वीकृतीची नवी वहिवाट
जनसागराचे लोटच्या लोट
मन हर्षले नयनरम्य सोहळा पाहून
राज्याभिषेक सोहळा छान
महाराष्ट्राच्या मातीची शान ..४

शिवबा आमचं भूषण
महाराष्ट्र मातीची ही देणं
जिजाऊ शहाजी राजांचा सुपुत्र महान
पळवून लावले सारे हैवान
राज्याभिषेक सोहळा छान
महाराष्ट्राच्या मातीची शान ..५

डॉ. पद्मा जाधव-वाखुरे
छ.संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे