‘न्यू मून’ येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी तारका रूखमोडे
‘न्यू मून’ येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
कवी कुसुमाग्रज,चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीस अभिवादन
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
तारका रूखमोडे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अर्जुनी/मोर: (दि २७) न्यु मून इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची पुण्यतिथी तसेच मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी चंद्रशेखर आझाद व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या देशसेवेविषयी मनोगते व्यक्त केली. त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली. मराठी गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी भाषणे, कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी भाषा गौरवाचे सुंदर ग्रिटींग कार्ड तयार करून व निबंध लिहून आणले.प्रा.तारका रुखमोडे व सागर जांभुळकर, निकिता बंसोड यांनी त्यांचं परीक्षण केलं.
प्राचार्य उंदिरवाडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा घेऊन मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, या मायबोलीचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
तर पर्यवेक्षिका प्रा. तारका रुखमोडे यांनी उत्तुंग व्यक्तिमत्त्व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहावर मार्मिक विवचन करत राष्ट्रप्रेम,सामाजिक विद्रोहसमता व मानवी संघर्षाचे परिपक्व विचार मांडणारा हा संग्रह, त्यावर समीक्षात्मक विवेचन केलं.व पिढीचा आक्रोश व अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा वैचारिक वारसा कवितेतून व मायबोलीच्या साहित्यातून जतन करण्याचं आवाहन केल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका त्रिवेणी थेर यांनी केले व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यात सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.



