बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या प्रांगणात बहरली परसबाग
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या प्रांगणात बहरली परसबाग
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: (दि २७): आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये संस्थेचे पदाधिकारी, संचालक यांच्या बहुमोल सहकार्याने व मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व नियोजनातून विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय सुंदरशा परसबागेची निर्मिती करण्यात आली. या परसबागेत मिरची, दुधी भोपळा, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, विविध प्रकारच्या फुलांची झाडे लावण्यात आली.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर, सहाय्यक शिक्षक अजित नाईक सर, शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश राणे सर, विशाल पाटील सर, प्रसाद पाटील सर, शतदा म्हात्रे मॕडम, प्रकाश गिरी, सुरेंद्र गायकवाड, मधुमती गायकर यांनी तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेऊन ही सुंदर अशी परसबाग तयार केली.
परसबागेला वेळच्यावेळी खत, पाणी दिले जाते. आता ही परसबाग आतिशय सुंदर अशी बहरली असून या बागेतून निघालेल्या वांगी, मिरची, दुधी भोपळा, टोमॅटो, कोथिंबीर अशा प्रकारच्या ताज्या भाज्यांचा इ. ५ वी ते इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी शिजविण्यात येणाऱ्या पोषण आहारात वापर केला जातो. विद्यालयाचा अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी असा हा उपक्रम असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.



