सजला आनंदाचा सोहळा…!; राजश्री ढाकणे
अभिमान मराठीचा

सजला आनंदाचा सोहळा…!
✍️नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ३ऑक्टोबर २०२४ ला मंत्रिमंडळ बैठकीत “मराठी भाषेला अभिजात दर्जा “देण्यात आला. माझ्यासहित प्रत्येक मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे “आनंदी आनंद गडे… जिकडे तिकडे चोहीकडे…!” अगदी असाच भासला असेल…हा आनंदाचा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारे साक्षीदार आहोत याचाही मनोमन सार्थ अभिमान दाटून आला…!…
✍️जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा सर्वात प्रथम मला आठवला ” माझा मराठीचे शिलेदार परिवार ” या परिवाराचे देवांश…महान संशोधक… चाणाक्ष संस्थापक… मुख्य आणि आदर्श प्रशासक…अतिउत्कृष्ट संपादक… मराठी भाषा सक्षमीकरणाचा अहोरात्र ध्यास असणारे… आदरणीय श्री राहुलदादा पाटील आणि त्यांच्या कार्यात त्यांना खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आणि या संस्थेच्या सचिव सौ. पल्लवीताई पाटील, मुख्य परीक्षक /प्रशासक / कार्यकारी संपादक सौ. सविता पाटील ठाकरे, मुख्य परीक्षक सौ. वैशाली ताई अंड्रस्कर, मुख्य परीक्षक सौ. स्वाती मराडे,सहप्रशासक सुधाताई, सौ. तारका ताई,शर्मिला ताई, वृंदाताई, प्रतिमा ताई,श्री अशोक दादा लांडगे,अरविंद दादा, आदरणीय विष्णु दादा संकपाळ, संग्रामदादा, विकास दादा… आणि आणखी शिलेदार परिवारातील पडद्यामागे राहून माय मराठीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व थोर व्यक्तींचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते…! त्यांच्या कार्याला सलाम करते…!!!… ????????????????????????????????
*”शिलेदार परिवारात आज*
*सजलाआनंदाचा सोहळा*
*मराठीला अभिजात दर्जा*
*सन्मान हर्ष खास आगळा..!”*
आज एवढा आनंद दाटला आहे की,शब्द तोकडे पडतील की काय माझ्या मराठीचे गुणगान करताना असे मला वाटत होते…!… पण लेखणी हाती धरताच शब्द सारे गोळा झाले… माय मराठीच्या सन्मान सोहळ्यात त्यांनीही आनंदाने हजेरी लावली… माझ्या माय मराठीचे वय सुमारे २५०० हजार वर्षे आहे…!!!.. किती साहित्याचा अमोल ठेवा तिच्या ह्रदयात तिने जतन करून ठेवला आहे… जे तिला आपल्या ह्रदयात पुजतात त्यांना ती भरभरून आशिष देते… त्यांच्या लेखणीत… वाणीत… आणि… नवल वाटेल पण श्वासात आणि रक्तातून ती अखंड वाहते…!!!..
*”भाग्यवान मी आहे*
*माझी माय मराठी*
*जोवर आहे श्वास देही*
*गुणगान तुझे या ओठी..!”*
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*





