
0
5
9
0
3
4
पाऊस
सोसाट्याचा वारा सुटला देत इशारा
झरझर झरझर धरणीवरती पडती धारा —धृ–
मेघ सावळे पळती वेगे उंच अंबरा
आनंदाने हर्षित झाली ही वसुंधरा
उल्हसित मेघ पिटू लागले ढोल नगारा
झरझर झरझर धरणीवरती पडती धारा—१
थेंब टपोरे आले अलगद अवनीवरती
स्पर्श तनाला होता झाली पुलकित धरती
चैतन्याने सजली सृष्टी रम्य नजारा
झरझर झरझर धरणीवरती पडती धारा—२
तृषीत धरणी शांत जाहली मनी हर्षली
पावसात या तृप्तीने ती चिंब जाहली
नद्या भरूनी वाहु लागल्या मिळे सागरा
झरझर झरझर धरणीवरती पडती धारा—-३
श्रीमती सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती
0
5
9
0
3
4



