Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरब्रेकिंगविदर्भ

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांवर कर वाढीचा बोजा कशासाठी?

निलडोह विकास आघाडीचा प्रशासनाला सवाल

0 6 3 5 4 1

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांवर कर वाढीचा बोजा कशासाठी?

निलडोह विकास आघाडीचा प्रशासनाला सवाल

हिंगणा शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

हिंगणा/ निलडोह, (दि ३ नोव्हेंबर): नगरपंचायत निलडोह हद्दीतील सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी करण्यात येत असलेल्या कर निर्धारण व कर वाढीच्या निर्णयाला निलडोह विकास आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात निलडोह विकास आघाडीच्या वतीने दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन अन्यायकारक कर वाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेती व्यवसाय अडचणीत असून रोजगाराच्या संधीही मर्यादित झाल्या आहेत. महागाईमुळे आधीच नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना त्यांच्यावर अतिरिक्त कराचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे. नगरपंचायत क्षेत्रात आजही पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाल्या आणि इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत अनेक समस्या कायम आहेत. नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नसताना कर वाढविण्याचा निर्णय घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल निलडोह विकास आघाडीने उपस्थित केला आहे.

प्रशासनाने नागरिकांची आर्थिक परिस्थिती, दुष्काळी परिस्थिती आणि उपलब्ध नागरी सुविधांचा विचार करून प्रस्तावित कर वाढीचा फेरविचार करावा. अन्यायकारक कर निर्धारण रद्द करून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी निलडोह विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

आज रोजी पुन्हा मुख्याधिकारी यांना याबाबतचे स्मरणपत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी संदीप नेहारे – विरोधी पक्ष नेता, प्रदीप फलके – नगरसेवक, हिसार रत्नसेन डहाट- नगरसेवक, प्रज्ज्वल तिरपुडे, नगरसेवक, अमिता उके 1 नगरसेविका, निशा वासनिक – नगरसेविका, चैतराम बिसेन, दुर्गाप्रसाद चित्रीव, मनोहर सोनुले, विनोद कडू, शिला श्रावन पुष्पतोडे, शुभम् पुष्पतोडे, राकेश सोनवाने, विक्की कनोजे, मुन्ना शेंडे, राहुल डोंगरे, शंकर हाडगे, मोहम्मद रोठा, पायल डोंगरे, छिपेकर काकाजी आदी उपस्थित होते.

“एका बाजूला दुष्काळाचे संकट, दुसऱ्या बाजूला महागाईचा मार आणि त्यात नगरपंचायतीची कर वाढ! सर्वसामान्य जनतेवर हा अतिरिक्त आर्थिक भार का?” करवाढीचा फेरविचार करा, जनतेला न्याय द्या!

निलडोह विकास आघाडी
नगरपंचायत, निलडोह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 5 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे