0
4
8
2
8
6
क्षुधा
नकोस जाऊ सखे तू गं दूर
तोडून अर्ध्यात जुळलेले सूर
विचाराने या धडधडतो ऊर
नयनातून वाहतोय अश्रूंचा पूर
तूच जागवलीस क्षुधा मनी
लावण्य तुझेच गं बावणखणी
पळायला लावून नकोस दमवू
मनातील गं क्षुधा नकोस शमवू
तृप्त करेन क्षुधा तुझ्या मनाची
चंद्राची तू चांदणी लई गुणाची
चंद्राची गं कोर मनात ठसली
क्षण ते आठवून गालात हसली
क्षुधा शमताच तनाची मनाची
आस राहिली नाही अन्य धनाची
मनाची श्रीमंती करेन परिश्रम
प्रेमाला देऊ गं जीवनी अग्रक्रम
प्रेमळ शब्दसरीत सखी भिजली
नव्या नवरीवाणी सर्वांगी सजली
मोगरा फुलताच मधुगंध पसरला
क्षुधा शमविण्या देहभान विसरला
संग्राम कुमठेकर
ता. जिल्हा लातूर
0
4
8
2
8
6



