चोपड्यात रानभाजी महोत्सव बचत गटांच्या महिला व शेतकरी गटांनी घेतला सहभाग
आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन
चोपड्यात रानभाजी महोत्सव बचत गटांच्या महिला व शेतकरी गटांनी घेतला सहभाग
आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन
चोपडा,जळगाव जिल्हा प्रतिनिधी
चोपडा : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने चोपडा येथे रानबाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
रानभाजी महोत्सवात महिला बचत गट व शेतकरी गटाचे प्रतिनिधींनी रानभाजी या महोत्सवात विक्रीसाठी ठेवले होते तसेच विविध खाद्यपदार्थ बनविले होते त्या खाद्यपदार्थाचे स्वाद आमदार लताताई सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी घेतला या रानभाजी महोत्सवात वर्षातून एकदा येणाऱ्या अशा भाज्यांच्या स्टॉल लावण्यात आलेला होता आणि ते घेण्यासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
चोपडा बस स्थानकात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते बस स्थानकात गावी जाणारे प्रवासी यांनी देखील रानभाजी महोत्सवांना भेट देऊन खरेदी करताना व खाद्यपदार्थांचा स्वाद घेताना दिसत होते या रानभाजी महोत्सवाचे आयोजनासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतला.



