आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध
गणित शिक्षक
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव

0
4
0
9
0
3
गणित शिक्षक
भारत विद्यालय, बेडगाची शान,
गणित शिक्षकांचा आहे मान।
समीकरणांचे उकल करणारे,
गणितात नवचैतन्य भरणारे।
गणित म्हणजे कोरडं नाही,
त्यातही जीवनाचं सार आहे काही।
शब्द नव्हे, पण सूत्रांची भाषा,
शिकवताना दिसते त्यांची खास प्रकाशा।
गणनांचे प्रश्न असोत कितीही कठीण,
ते सोडवायला शिक्षक असतात
सज्ज मनाने खवखवीन
π, √, कोन व त्रिज्या,
सर्वांमध्ये ते शोधतात नवचिंतनाची दिशा।
विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास पेरणारे,
शंकांचे निरसन हसत-हसत करणारे।
गणितात रस निर्माण करणारे,
भारत विद्यालयाचे खरे रत्न ठरणारे।
धन्यवाद त्यांना, शतशः वंदन,
ज्ञानदानात त्यांचे असो अमूल्य योगदान।
गणिताच्या दालनात प्रकाश पसरवणारे,
आपले गणित शिक्षक – मार्गदर्शक खरे।
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव
==========
0
4
0
9
0
3





