0
4
0
9
0
3
लळा मातीचा
बळीराजाच्या मनाला
लळा मातीचा लागला
रात्रंदिन कष्ट करी
नाही उसंत जीवाला !
अनवाणी पाऊलाने
करी पेरणी शेताची
सदा त्याच्या मनामध्ये
आस मळा फुलण्याची !
उभा जन्मच वाहिला
काळ्या मातीमध्ये त्यानं
डोळा हिरवं सपान
कधी भरलं मोत्यानं!
देऊ पिका योग्य भाव
नको हेळसांड त्याची
राहू सारे उतराई
ठेवू जाणीव कष्टाची !
सुनिता नाईक
कुरुळी ,पुणे
0
4
0
9
0
3





