
0
5
1
7
9
5
अभिजात मराठी
भाषा मराठीचा
मला असे अभिमान
अभिजात मराठी
तीचा आम्हा स्वाभिमान
माय मराठी प्राचीन
ती सम्रृधदीची खान
ज्ञानेश्वरांनी लिहीली
ज्ञानेश्वरी ही महान
माझ्या तुकोबांची गाथा
लागे अभंगाचे ध्यान
त्यात जीवनाचे सार
पळे मनातील अज्ञान
माझी भाषा ही स्वतंत्र
ती नसे उसनवार
ती असे बहारदार
ती ज्ञानाचे आगर
माझी मराठी भाषा
कला संगीतान सजली
प्रेम स्नेह आपुलकी
तीच्या शब्दात भावली
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
=======
0
5
1
7
9
5


