कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
बाजारीकरण; सुलोचना लडवे
0
4
8
2
9
0
बाजारीकरण
एक काळ असा होता
वस्तुविनिमय पद्धतीचा
आज त्या जागी वाढला
व्यापार नगदी पैशाचा
प्रत्येक वस्तुची किंमत
ठरते बाजारभावाने
शेअर मार्केटचे गणित
ठरती भाव रूपयाने
एकेकाळी होती स्री
आपल्या घराची ईज्जत
होती घराची लक्ष्मी
खानदानीची कडक शिस्त
फॅशनच्या नावाखाली
झाले आज बाजारीकरण
लागली प्रदर्शनाची होड
अंगप्रदर्शन विणाकारण
इथे ठरू लागले भाव
अब्रु घराची बाहेर गेली
केवळ पैशाला महत्व
संस्कृतीचे भान हरवली
बाजार झाला महागडा
भ्रष्टाचार वाढीस लागला
हरवली सर्व नीती मुल्ये
केवळ पैसा उद्देश ठरला
शेतक-याचा माल निघता
बाजारभाव जाती खाली
दलाल खातो दलाली
शेतकरी उपाशी पोट खाली
बाजारीकरणाच्या व्यवस्थेत
सामान्य माणुस भरडला जातो
ज्याची घोडी त्याला लगाम
परिस्थितीने चिरडला जातो
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
0
4
8
2
9
0



