0
4
0
8
9
2
हसते चेहरे
हसते चेहरे लोभस
देती सर्वांना आनंद
पाहून तयांचे हसणे
मनी होई परमानंद
सुख असो किवा दुःख
करती ना उगीच चिंता
हसतमुख व्यवहाराने
कार्य यांचे सदा जनहिता
व्यक्तीमत्व नित्य असे
प्रेरणादायी सर्वांना
उगीच लावून रडगाणे
करती ना कुठला बहाणा
कुरबुर ना निराश वृत्ती
आशावादी असते मन
सकारात्मक विचाराने
जगत असतात जीवन
नाही लागत हसायला
पैसा,अडका,संपत्ती
समाधान मानून मनी
जपती खेळकर प्रवृत्ती
दुःख हरती इतरांचे
सभ्य बोलणे वागणे
घेवू त्यांचा आदर्श नी
करू सुखकर जगणे
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
0
8
9
2





