तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे शिवजयंती उत्सव शनिवारी
शहर प्रतिनिधी, नागपूर
तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे शिवजयंती उत्सव शनिवारी
शहर प्रतिनिधी, नागपूर
नागपूर.(दि १८): तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूर च्यावतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन शनिवार 22 फेब्रुवारी रोजी, तिरळे कुणबी सेवा मंडळ समाज भवन टाऊन हॉल आशीर्वाद नगर रिंग रोड नागपूर येथे सकाळी 10:30 वाजता. शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे.
दीपप्रज्वलन व थोर पुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. यावेळी तिरळे कुणबी सेवा मंडळाचे मार्गदर्शक माजी आमदार आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष सुधाकरराव कोहळे, अध्यक्ष पांडुरंग वाकडे पाटील सचिव नितीन हांडे तथा यावेळी सुधाकरराव देशमुख सौ. नंदाताई जिचकार, किसन गावंडे, विजयराव राऊत व रमेश शिंगारे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार, या सोहळ्यात आमदार सर्वश्री मोहन मते, विकास ठाकरे, आशिष देशमुख, समीर मेघे, रवींद्र ठाकरे, अविनाश कातडे, मधुकरराव वानखेडे ज्येष्ठ नागरिक, लक्ष्मण राऊत ज्येष्ठ नागरिक, जगन्नाथ भोयर जेष्ठ नागरिक तसेच माजी आमदार सुधाकर कोहळे हे समाज बांधवांना मार्गदर्शन करतील. व इतरही मान्यवर मनोगत व्यक्त करतील. या कार्यक्रमाचा तिरळे कुणबी समाज बांधवांनी लाभ घ्यावा. शिवजयंती उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक रवीप्रकाश ढोक, कोषाध्यक्ष महादेवराव बोराडे व सल्लागार समितीची युवराज गुडधे हे अथक परिश्रम घेत आहेत.





