Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशविदर्भसाहित्यगंध

मनिप्लांट

संध्या मनोज पाटील अंकलेश्वर (गुजरात)

0 5 1 8 0 2

मनिप्लांट

मनिप्लांट..
तसं इंग्रजी नाव तुझं..
तुला बघून मन मोहात पडलं माझं..
कोवळी,हिरवी पानं…
तुला नाही माती,कुंडीचा ताण…
काचेच्या बाटलीतही तू ताजातवान ..
अस म्हणतात,तू पैशाचा वेल..
तुझ्यामुळे घरात वाढते आर्थिक रेलचेल..
तुला दुसऱ्याकडून चोरून आणायचं…
आणि आपल्या कुंडीत लावायच….
मग येतो पैसा भरभरून घरात..
एकंदरीत, इथेही असतो स्वार्थच मनात..
किती मतलबी आहे ना मानव…
एवढा स्वार्थी तर नव्हता दानव…
तू मात्र माझ्या घरी,
रोपवाटिकेतून आला..
कळलेच नाही कधी इतका
जिवलग झाला…
सकाळी उठताच तुझी भेट घेते..
लगेचच जवळची तुळशीही,
मंद झुळक येता डोकावते…
तीलाही तुझ्यासवे प्रेमाने न्याहाळते..
गुड मॉर्निंग डिअर्स म्हणत..
रम्य सहवासात मी रमून जाते…
म्हणूनच कदाचित नाही जमले मला..
या स्वार्थी दुनियेवर प्रेम करायला..
ही छोटीसी पानाफुलांची दुनिया,
पुरेशी आहे मला…
या जीवनी आनंद भरायला…!
या जीवनी आनंद भरायला…!

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर (गुजरात)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे