“ऋणात मी”; माधुरी काळे
“ऋणात मी”; माधुरी काळे
मराठीचे शिलेदार समूहात
रोज नवीन विषयाची आरास
तिथूनच सुरू सारस्वतांचा
लेखणीचा सुखकर प्रवास
“तुमचा फोटो पाठवा’ असा व्हॉटस अप ला सलग दोन दिवस मॅसेज मिळाले आणि मग माझी गडबड झाली सुरू कोणता पाठवू फोटो. छान वाला पाठवते एकच नंबर वाटले पाहिजे सन्मानपत्र. कारण सांगते तुम्हाला लय लोक बघतात न…. स्टेटस ला … अन् मग सुरू होते …अभिनंदन अभिनंदन .. अन् मी मोठया तोऱ्यात म्हणते धन्यवाद! धन्यवाद! तुम्ही हसू नका बा… उगाचच नाही मिळत प्रशंसा आणि आजकाल तर काय साधे कुणी इतरांना छान म्हणायला पण येवढं जड जसे काही शब्द म्हणजे कुठूनतरी मोठा दगड उचलून आणत आहोत अश्या प्रकारे प्रतिक्रिया देतात…..पण तुम्हाला आनंदाची बाब सांगते. तुम्ही ओळखता माझ्या शिलेदार समूहाला खूप खूप श्रीमंत आहे माझा समूह विचारांने, कर्तुत्वाने, ज्ञानाने, सहज दान देतात ज्ञानामृत पाजतात शिलेदारांना.. अन् उमटवितात ठसा राज्याच्या कानाकोपऱ्यात आम्हां लेखकांचा … अश्या माझ्या या शिलेदार समूहाचा मला सार्थ अभिमान आहे…. आणि तो मी जपणारच.
कविता लिहायला खूप आवडते पण शाळेतील काम आणि रोजच्या प्रवासामुळे डोकं काही कामं करत नाही.३२ किमी. रोजचे जाणेयेणे.. अंतर खूप आहे त्यातल्या त्यात रस्ता खराब एक ते दीड त्रास प्रवास. शाळेत आल्यावर विद्यार्थी काहीतरी सुचते न लगेच आवाज येते मॅडम जी. सुचलेली रचना तिथेच थांबते.. त्यादिवशी मुलांनी ईमली झटका चॉकलेट दिले आणि रचना सुचली अन् ती सर्वोत्कृष्टसाठी पात्र ठरली खूप आनंद झाला.सर्व परीक्षकांचे खूप खूप आभार. रचनेचा तुम्ही सन्मान केला.
रोज प्रवासात मैत्रीण सोबत चर्चा करीत असताना बर वाटत नाही ग स्वतःकडे वेळ द्यायला मिळतं नाही किती रोजची दगदग आपणं आपली काळजी घ्यायला हवी… तेव्हा मला ‘खबरदारी’ हा विषयावर काय रचना लिहावी सुचले आणि ती तुमच्या समोर सादर केली…. असा हा प्रवास लेखणीचा सुद्धा…. प्रत्येक प्रसंगातून आपण खरच काही न काही शिकतो
मला आवर्जून सर्वांना सांगावेसे वाटते.समूहात येणाऱ्या रचना त्यासोबतच परीक्षकीय मार्गदर्शन वाचन केले तर आशय मांडणी करतांना सोपे वाटते. म्हणजे नेमके रचनेत काय यायला हवं ते कळते.आदरणीय सविता ताई, आ.स्वाती ताई आ. वैशाली ताई आ.विष्णू दादा मी नेहमीचं वाचन करते पण कधीकधी प्रतिक्रिया देते.त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करते.
शिलेदार समूहाचे आधारवड आदरणीय राहुल दादा, संस्थेच्या सचिव आ. पल्लवी ताई,आ. सविता ताई, आ. वैशाली ताई, आ.विष्णू दादा, आ. स्वाती ताई आ. वृंदा ताई…आ. तारकाताई, आ. शर्मिलाताई, आ. संग्राम दादा, आ. उरकुडे दादा, आ. अशोक दादा, सर्व प्रशासक,सहप्रशासक, परिक्षकांची मी मनापासून खूप खूप आभारी आहे.
कवयित्री माधुरी काळे
वणी जिल्हा यवतमाळ
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह





