“आभारीय मनोगत”; सुलोचना लडवे
आज माझ्या हायकू काव्य रचनेला सर्वोत्कृष्ट पोस्टरने सन्मानित केले त्याबद्दल समूहाचे सर्वेसर्वा आदरनिय राहुल दादा पाटील सर, मा.पल्लवीताई, मा.सविताताई, मा.वैशालीताई, मा.स्वातीताई, मा.तारकाताई, मा.संग्राम दादा, मा.विष्णुदादा, मा.अरविंद दादा, मा.अशोक दादा समस्त मा.परिक्षक गण,मा.प्रशासक,मा.सहप्रशासक,मा.संकलक सर्वांचे मनःपूर्वक आभार.
घरपणाची घराची जबाबदारी निभवताना स्त्रियांना कसरत करावी लागते.त्यात गरीबीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न.घरातल्या लेकरांची काळजी या सर्व गोष्टी सांभाळताना कितीही गरीबी असली तरी यातून प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट होण्यासाठी उत्कृष्ट नियोजन एक स्त्रीच करू शकते.आदरनीय राहुलदादांनी या भावनेतून दिलेल चित्र अत्यंत बोलकं होत.मुलाला पाठीशी घेऊन गाडा ओढणारी स्त्री म्हणजे कर्तव्यपुर्तीची बोलकी पाठशाळा.चित्रावरून सहज सुचलेले शब्द आणि ते काव्यबद्ध होऊन सर्वोत्कृष्ट पोस्टरने झळकले यातून मिळणारा आनंद अवर्णनिय.
असेच विविधांगी उपक्रमातून विविधांगी विषय देऊन लेखनीला बोलक व्हायला राहुल दादा भाग पाडतात. निश्चितच यातून नाव,प्रतिष्ठा सर्व काही मिळताना शिलेदार समूहात असल्याचा अभिमान वाटतो.मराठी भाषेसह साहित्याला सुदृढ करण्याचा मा.दादांचा हा यज्ञ दिवसेंदिवस ज्ञानाची वलय वाढवित आहे.आज माझ्याकडे जे साहित्यिक ज्ञान आहे ते सर्व शिलेदार समूहाची देण.
पुनश्च एकदा मा.सर्व परिक्षकांचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करणा-या सर्व ताई दादांचे मनःपूर्वक आभार.
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह



