आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरवर्धाविदर्भसाहित्यगंध
भ्रमात अडकलेला जीव
डॉ. बालाजी राजूरकर ता. हिंगणघाट जि. वर्धा

0
5
4
7
2
3
भ्रमात अडकलेला जीव
नव्हती ठरली वेळ,
जन्माची मरणाची काही,
घमेंड माणूसपणाची,
तुझं काही खरं नाही।
जन्मवेळेच्या धाग्यावर,
भविष्य विणतोस जाई,
भोंदूंच्या शब्दांवर,
तुझं काही खरं नाही।
दक्षिणा देऊन पोसतो,
अंधश्रद्धेची ही राई,
डोळे उघडून पाह रे,
तुझं काही खरं नाही।
चंद्र-सूर्य-ग्रहांनी,
आयुष्य ठरत नाही,
विज्ञान विसरून चाललास,
तुझं काही खरं नाही।
जो सांगतो भविष्य,
त्यालाच ठाव नाही,
खोट्या स्वप्नांच्या मागे,
तुझं काही खरं नाही।
जग कुठे चाललंय,
समजून घे जरा भाई,
नाहीतर पुढल्या पिढीचं,
काही खरं नाही।
शिव्या खात आयुष्य,
मान उरणार नाही,
सत्य स्वीकारायला शीक,
तुझं काही खरं नाही।
डॉ. बालाजी राजूरकर
ता. हिंगणघाट जि. वर्धा
0
5
4
7
2
3



