
0
4
0
9
0
3
ललकारी
तुबडक तुबडक पुढे चालला
अन्यायाचा टांगा..
न्यायासाठी ललकारी ही
कुणास लावू सांगा..?
उसवून सारे नात्याचे धागे
जो तो धावे पैशामागे
मनु झालायं अर्थपिपासू भुंगा.!
न्यायासाठी ललकारी ही
कुणास लावू सांगा??
हरवल्या संवेदना,लुप्त झाल्या भावना
वाचेत- वागण्यात आली ती वल्गना
चरावर चर चढती,मतलबी त्या रांगा..
न्यायासाठी ललकारी ही
कुणास लावू सांगा??
सृजनाचे धडे झाले ग्रंथातच बंद
माणूसच माणसाशी खेळतो द्वेषद्वंद
जिकडेतिकडे नुसता घातपात नि दंगा
न्यायासाठी ललकारी ही
कुणास लावू सांगा??
खालपासून वर भ्रष्टाचारी किड
पैसाविना दीन तुटतो तिळतिळ
खुर्चीसाठी राजकारण्यांचा चाले धांगडधिंगा
न्यायासाठी ललकारी ही
कुणास लावू सांगा??
वनिता गभणे
आसगाव जि.भंडारा
0
4
0
9
0
3





